पीरबावडा (जि.औरंगाबाद) : फुलंब्री हा माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघ आहे. तालुक्यातील पीरबावडा गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमान नगर शेतवस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे येथे राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांना ये-जासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या वस्तीवर जवळपास तीस ते चाळीस कुटुंब राहत आहेत. त्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी आपला जीवधोक्यात घालून रस्ता ओलांडवा लागत आहे. जवळच तळ्याची पाळू आहे. त्या पाळुवरून मुलांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत सोडण्यासाठी पालकांना सोबत जावे लागत आहे. रात्री अथवा दिवसा एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी दुचाकी काय? पण पायी जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रस्ता नसल्याने रुग्णांना सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा रस्ता तयार करण्यात आलेला नाही.
(व्हिडिओ - बाबासाहेब ठोंबरे)
#aurangabad #marathinews #breakingnews #esakal #sakal